“तें दिवस (आरंभकाळ)”

यंदा बऱ्याच दिवसांनी मराठी पुस्तक हाती आले. पुस्तकाचे नाव “तें दिवस” (आरंभकाळ). या पुस्तका मुळे मला तेंडूलकर समजले असे  म्हणता येणार नाही. कित्येकदा  नेहमीची ओळखीची माणसे  देखील आपल्याला समजत नाही. त्या उपर, लेखक समजून घ्यायला एक पुस्तक पुरेसे नाही असे माझे प्रामाणिक मत आहे. एक मात्र तेंडुलकरांचे लिखाण गुळमुळीत नसणार हे मात्र नक्की.

या पुस्तकातील प्रसंगांच्या उल्लेखा मुळे मला काही गोष्टी वेगळ्या दृष्टीक्षेपातून कळल्या. या गोष्टी पूर्वी अश्या पद्धतीने वाचनात न आल्या मुळे इतिहासातील हे बारकावे आपणास माहित नव्हते हे हि समजले. माझ्या देखील १९२८ – १९६० चा काळ हा इतिहासच.

पुस्तकातून मला उमजले ते :

“… भूतकाळ मनातच बारा असतो. तो प्रत्यक्षात पुन्हा भेटणे खरे नसते. तो भूतकाळ उरलेला नसतो…”  भूतकाळातील भूगोल आणि माणसे अगदी आपल्या सकट बदललेली असतात.

दुसरे मला जाणवले तें म्हणजे भारतीय शिक्षण व्यवस्थेत विद्यार्थ्याची “मानहानी” करणे याला पण मोठा इतिहास आहे. बहुतांश शिक्षक त्यांच्या शिकवण्याच्या पद्धती वरून नव्हे तर मुलांचा पाणउतार करण्या मुळे लक्षात राहतात.

प्रेम भंग झाल्या वर आत्महत्या किंव्हा तत्सम प्रयत्न हे काही फक्त आजचे सिनेमे/ टीव्ही मालिका मुळे होत नसून ते १०० वर्षापूर्वी पण होत असे.

गांधीखुनाला  गांधीवध म्हणणारेच नव्हे तर तसे छापणारे महाभाग पुण्यात होते. आणि तेंडुलकरांना ते जाणवले, खुपले. कारण  “वध” हा फक्त दुष्ट माणसांचा होतो असे पुराणात नमूद केले आहे.

शेवटचे, एक जाणवते कि जी माणसे प्रवाहाच्या उलट जातात तीच आयुष्यात काही करू शकतात.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s